मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला संधी ? ; अधिवेशनापूर्वी फेरबदल, मंत्रीपद मिळणार..

0
242

मुंबई, दि. २ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असून शिंदे सरकारमधील खातेवाटप लवकरच जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे १८ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला संधी मिळणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हे फेरबदल होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील हा दुसरा फेरबदल असणार आहे. दरम्यान, शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते.

या फेरबदलात महाराष्ट्रातील शिंदे गटाला स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. ज्या राज्यांत २०२२-२३ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत त्या राज्यांतील सदस्यांना संधी दिली जाऊ शकते. शिंदे गटातून कुणाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार याची चर्चा सध्या रंगली आहे. बिहारमधून जदयू कोट्यातून नवा चेहरा दिला जाणार आहे. यासाठी शिंदे गटाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. ‘दिव्य मराठी’ने हे वृत्त दिले आहे.

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : आघाडीचा उमेदवार ठरला ; नार्वेकर विरुद्ध साळवी सामना रंगणार –
शिंदे सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यासाठी ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन होणार आहे.विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांनी आज अर्ज भरला. भाजपकडून कुलाब्याचे तरुण आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.