मोदींच्या देहू भेटीची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे..

0
338

इंदापूर, दि. १ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगदगुरू श्री. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाकरीता देहू येथे दि.१४ जून रोजी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे हा दौरा यशस्वितेची जबाबदारी दिली आहे.

त्या पार्श्वभूमीवर दि. १ जून रोजी हर्षवर्धन पाटील यांनी देहू येथे जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून देहू संस्थान, पोलीस तसेच इतर विभागाचा आढावा घेतला. यावेळी दौरा नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,श्री. संत तुकाराम महाराज देहू संस्थांचे विश्वस्त व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.