मोदींच्या जागेवर अमित शाह पंतप्रधान होतील – अरविंद केजरीवाल

0
137

तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभेद्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. “पुढील वर्षी १७ सप्टेंबर रोजी मोदी ७५ वर्षांचे होणार असून त्यांना राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल आणि त्यांच्याजागी अमित शाह पंतप्रधान होतील”, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता. या दाव्यावर आता अमित शाह यांनी थेट उत्तर दिले आहे. तेलंगणाच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांनी आज हैदराबाद येथे पत्रकार परिषद घेतली.

अमित शाह काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे होणार असल्यामुळे केजरीवाल आणि कंपनीला फार आनंदीत होण्याची गरज नाही. ७५ व्या वर्षी निवृत्त व्हावे, हे भाजपाच्या घटनेत कुठेही लिहिलेले नाही. नरेंद्र मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील. याबाबत भाजपात कोणताही संभ्रम नाही. विरोधक मात्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना अमित शाह म्हणाले की, या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील जनता पंतप्रधान मोदी यांच्यामागे आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही याची कल्पना आहे की, आम्ही ४०० पार जाणार आहोत. तसेच मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच अशाप्रकारचे विधान करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

२०२९ च्या निवडणुकीतही पंतप्रधान मोदीच
अमित शाह पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हेच २०२९ पर्यंत पंतप्रधानपदावर राहतील. तसेच २०२९ च्या निवडणुकीचे नेतृत्वही त्यांच्याकडेच असेल. इंडिया आघाडीसाठी आनंद वाटावा, अशी कोणतीही बातमी नाही. त्यांना अधिक कष्ट घेण्याची गरज आहे. भ्रष्टाचारा संपविण्याची गरज आहे. तसेच लोकांबद्दल अधिक संवेदनशील राहण्याची गरज आहे. याऐवजी विरोधक अपप्रचार करून निवडणूक जिंकू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी देशाला पुढे घेऊन गेले आहेत, तसेच देशाला ते आणखी पुढे घेऊन जाणार आहेत. याबद्दल आमच्या मनात दुमत नाही. तसेच देशातील जनतेलाही हे पटलेले आहे.