– मोदी हे स्त्रियांच्या सन्मानाची भूमिका मांडतात, मात्र दुसरीकडे बिल्किस बानो दोषींची सुटका
ठाणे, दि. २९ (पीसीबी) – लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्त्रियांच्या सन्मानाची जी भूमिका मांडतात, ती भूमिका प्रत्यक्षात बिल्किन बानो प्रकरणातील दोषींची सुटका करताना दिसली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. बिल्किस बानो प्रकरणात सेशन कोर्ट, हाय कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना जन्मठेप दिली. ही ११ किंवा १२ वर्षाची जन्मठेप दिली नव्हती. ती आजन्म जन्मठेपेची शिक्षा दिली. गुजरातमधील भाजपच्या सरकारने या आरोपींना मुक्त केलं. त्या आरोपींचा सत्कारही केला.
पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट रोजी भाषण दिलं. मी त्यांचं भाषण बारकाईने ऐकलं. त्या भाषणात त्यांनी स्त्रियांच्या सन्मानावर जोर दिला. पण त्यांच्याच गुजरातमधील सरकारने अत्यंत घाणेरडं कृत्य करणाऱ्या आऱोपींना सोडून दिलं. यात लाल किल्ल्यातील भाषणात स्त्रियांची सन्मानाची जी भूमिका मांडली. तिची प्रचिती गुजरातमधून एका निर्णयातून समोर आली नाही. ही चिंताजनक आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सरकारमधून पाहायला मिळत आहेत. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.
राजकीय नेतृत्वाच्या मागे काही ना काही तरी कारणातून ईडी कशी लावता येईल, सीबीआय लावता येईल का हे प्रकार सुरू आहेत. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. गुजरातमध्ये या तक्रारी आहेत. झारखंडमध्ये या तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी केंद्रात ज्यांची सत्ता आहे, ते लोक त्यांची ज्या राज्यात सत्ता नाही, तिथलं सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकात आज भाजपचं सरकार आहे. पूर्वी हे सरकार नव्हतं. आधीच्या सरकारमधील काही लोक फोडले गेले. त्यांच्या मदतीने सरकार बनवलं. महाराष्ट्रात शिवसेनेतील एक वर्ग बाजूला केला आणि सरकार घालवलं. मध्यप्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वात सरकार होतं. पण ते फोडून भाजपने सरकार स्थापन केलं आहे. सत्ता लोकांनी दिली नाही तर लोकांनी दिलेल्या सदस्यांना फोडून त्यांना बाजूला करून ही सत्ता हातात घ्यायची हे काम भापजने केलं आहे.
माणसं फोडून सरकार करणे हे देशासमोर आव्हान
देशात राज्य सरकारात त्यांना संधी मिळेल याचा विश्वास त्यांना नाही. केरळमध्ये, आंध्रात, तेलंगणात बिगर भाजपा सरकार आहे. झारखंडमध्ये, पश्चिम बंगालमध्ये बिगर भाजप सरकार आहे. हे बघितलं तर मोजक्याच राज्यात भाजपचं सरकार होतं. इतर राज्यात सरकार नाही. त्यामुळे लोकांचं मत काय होतं हे दिसून येतं. सत्ता येत नसेल तर माणसं फोडणं, ईडीचं वापर करणं हे चित्रं देशात दिसत आहे. हे देशासमोर आव्हान आहे. बिगर भाजपा पक्षांशी संवाद साधून आम्ही सरकार विरोधात जनमत तयार करणार आहोत. अजून चर्चा केलेली नाही. यात लक्ष घालण्याची गरज आहे. कारण संसदीय लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. असे शरद पवार म्हणाले.