दि.१४(पीसीबी)-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एका व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प हे वारंवार ते “मोदींचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करू इच्छित नाहीत” असे म्हणताना दिसत आहेत. दरम्यान या व्हिडीओबद्दल भारत सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयायाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना गुरूवारी झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये या व्हिडीओबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर त्यांनी आपण हा व्हिडीओ पाहिला नसल्याचे म्हटले आहे.
जेव्हा ट्रम्प यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असतान जयस्वाल म्हणाले की, “मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही. पण जर खरंच असा व्हिडिओ असेल, तो खरा असेल किंवा खोटा असेल, त्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू.”
एफबीआयच्या संचालकांबरोबरच्या ट्रम्प यांच्या प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे असून या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांचे हे विधान आले आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प हे पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना म्हणाले होते की, “मोदी हे एक महान व्यक्ती आहेत, “मोदी एक महान व्यक्ती आहेत, आणि ते ट्रम्प यांच्यावर प्रेम करतात.” तसेच ट्रम्प यांनी यावेळी ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थ काळजीपूर्वक लावण्यात यावा असेही स्पष्ट केले होते. “याचा दुसरा कोणताही वेगळा अर्थ घेऊ नका,” असे ट्र्म्प म्हणाले होते.
“ते एक महान व्यक्ती आहेत. मोदी एक महान व्यक्ती आहेत, ते ट्रम्प यांच्यावर प्रेम करतात. आता, मला माहिती नाही की ‘प्रेम’ हाच शब्द आहे का, तुम्ही याचा वेगळा अर्थ घेऊ नये असे मला वाटते. मला त्यांचे राजकीय करिअर नष्ट करायचे नाहीये, पण तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की, मी अनेक वर्षांपासून भारताला पाहात आलो आहे. माझे मित्र (मोदी) तिथे बऱ्याच काळापासून आहेत,” असे ट्रम्प त्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते.
व्यापार आणि रशियाबरोबरचे द्विपक्षीय संबंध याबद्दल बोलताना जयस्वाल म्हणाले की, “रशिया आणि भारत याच्यात व्यापारापासून ते लोकांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण, संरक्षण क्षेत्रातील सहभाग आणि इतर मुद्द्यांवर सातत्याने बोलणी आणि सहकार्य सुरू आहे. आपल्या द्विपक्षीय सबंधांचे हे सर्व पैलू असेच वाढत राहतील.”







































