मोठी बातमी – मायक्रोसॉफ्ट कंपनी पिंपरी चिंचवड शहरात

0
422

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – मायक्रोसॉफ्ट कंपनीने पिंपरी चिंचवड शहरातील फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून १०.८९ लाख चौरस फुटांचा व्यावसायिक भूखंड घेतला आहे. मायक्रोसॉफ्टची गुंतवणूक पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी खूप मोठी लाभदायक ठरणार असून हिंजवडी आयटी पार्कच्या बरोबरीने रोजगाराची संधी उपलध्द होणार आहे.मायक्रोसॉफ्टने फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून १०.८९ लाख चौरस फुटांचा व्यावसायिक भूखंड घेतला आहे. हा भूखंड पुण्यातील पिंपरी वाघेरे येथे आहे.यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीजसोबत कंपनीने भाडेतत्वावर भूखंड हस्तांतरणासाठी ३२८ कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारामुळे पुण्यातील नवतरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

टेक दिग्गज मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (इंडिया) ने पुण्यातील १०.८९ लाख चौरस फुटांचा व्यावसायिक भूखंड फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून ३२८.८४ कोटी रुपयांच्या एक रकमेत विकत घेतला आहे, असे प्रॉपस्टॅकने ऍक्सेसने जाहीर केलेल्या दस्तावेजांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हा व्यावसायिक भूखंड पुण्यातील पिंपरी वाघेरे येथे आहे. या करारावर कंपनीने १६.४४ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने (इंडिया) प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “दर्जेदार रिअल इस्टेट, परवडणारी घरे आणि मानवी संसाधनांच्या उपलब्धतेमुळे पुणे हे मोठे कॅम्पस उभारण्यासाठी आदर्श आहे.

तथापि, अनेक कॉर्पोरेट्सने त्यांच्या विस्तारासाठी बेंगळुरू आणि अलीकडे हैदराबादला पसंती दिली आहे. या व्यवहारामुळे पुणे प्रबळ दावेदार म्हणून उदयास येण्याची सुरुवात होऊ शकते. आमच्याकडे पुढील काही तिमाहींमध्ये असे अधिक व्यवहार होतील,” प्रॉपस्टॅकचे सह-संस्थापक राजा सीतारामन म्हणाले.या वर्षी जूनमध्ये मास्टरकार्ड टेक्नॉलॉजीने पुण्यातील एका व्यावसायिक इमारतीत ४ लाख चौरस फूट जागा २० वर्षांसाठी भाड्याने दिली होती. याचे भाडे ४.१२ कोटी रुपये प्रति महिना आहे.