मुंबई, दि. 28 (पीसीबी) : मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये भाजपकडून सर्वाधिक 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीमध्ये 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आता भाजपकडून आपली तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपनं तीन याद्यांमधून महायुतीमध्ये सर्वाधिक 146 उमेदवारांची घोषणा केली आहे.
भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये माळशिरसमधून पुन्हा एकदा राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राम सातपुते यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या हेत्या, या पराभवानंतर आता त्यांना भाजपकडून माळशिरसमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर आष्टीमधून सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आर्वीतून सुमीत वानखेडे, वर्सोव्यातून भारती लव्हेकर, कारंजा सई डहाळे, सावनेर आशिष देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मुर्तिजापूर – हरीश पिंपळे कारंजा -सई डहाके तिवसा- राजेश वानखडे मोर्शी- उमेश यावलकर आर्वी-सुमित वानखेडे काटोल- चरणसिंग ठाकूर सावनेर – आशीष देशमुख नागपूर मध्य – प्रवीण दटके नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले नागपूर उत्तर – मिलिंद माने साकोली – अविनाश ब्राह्मणकर चंद्रपूर – किशोर जोरगेवार आर्णी – राजू तोडसाम उमरखेड – किशन वानखेडे देगलूर- जितेश अंतापूरकर डहाणू – विनोद मेढा वसई – स्नेहा दुबे बोरीवली – संजय उपाध्याय वर्सोवा – भारती लव्हेकर घाटकोपर पूर्व – पराग शाह आष्टी – सुरेश धस लातूर – अर्चना पाटील चाकूरकर माळशिरस – राम सातपुते कराड उत्तर – मनोज घोरपडे पलूस -कडेगाव संग्राम देशमुख
दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. विधानसभेसाठी 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. आतापर्यंत महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांच्या एकूण दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तीन तर भाजपकडून तीन उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.