मोठी बातमी! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपीने स्वत:वरच झाडून घेतली गोळी, सिनेस्टाईल थरार

0
96

बदलापूर,दि. २३ (पीसीबी) : राज्यात बदलापूरच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे, असं असतानाच आता बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पोलिसांच्या बंदुकीने गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदेंने पोलीसांची बंदूक हिसकावून स्वत:वर गोळी झाडली आहे. पोलिसांच्या बंदुकीने गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन राऊंड फायर झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला आहे. या वेळी अक्षयला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहे. अक्षयची प्रकृती गंभीर आहे. हा एन्काऊंटर नसून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.