मोठी बातमी! ‘पुष्पा 2’ प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक

0
66

हैदराबाद दि. 1३ (पीसीबी) : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. याविरोधात बुधवारी त्याने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरीत श्वास गुदमरल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.