मोठी बातमी! ‘त्या’ व्यक्तीचा फोन आला अन् मधुरिमाराजेंनी माघार घेतली; उलटसुलट चर्चांना उधाण

0
3

कोल्हापूर, दि. 05 (पीसीबी) : उमेदवारी अर्ज मागे घ्यायला अवघी 10- 12 मिनिटं असताना काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा झालेला संताप महाराष्ट्राने पाहिला. पण ऐनवेळी मधुरिमा राजे यांनी माघार का घेतली? याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यावर कोल्हापूरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी प्रतिक्रिया दिली आहे. काहीही ठरवून झालेलं नाही. राजू लाटकर यांच्या वडिलांचा फोन आला आणि मधुरिमाराजेंनी माघार घेण्याचं ठरवलं. त्यांचा फोन माघार घ्यायला कारणीभूत ठरलेली आहे, असं सुनील मोदी यांनी सांगितलं.

आता कोल्हापूरच्या जनतेला पुरोगामी विचार पटवून देणार आहोत. महाराजांशी आम्ही बोललो तेव्हा ते म्हणाले की चिन्हा पेक्षा विचार महत्वाचा आहे. जर राजू लाटकांना काँग्रेसने पाठिंबा दिला तर स्वत: शाहू महाराज छत्रपतीदेखील प्रचार करताना दिसतील, असंही सुनील मोदी यांनी सांगितलं. राजू लाटकर यांच्याशी मी स्वत: बोललो होतो. कोणत्याही परिस्थितीत राजू लाटकर हे माघार घेणार, हेच ठरलं होतं. आम्ही राजू लाटकरांच्या संपर्कात होतो. राजू लाटकर यांना भेटूनी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो. ते पावणे तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात येणार होते. 2. 35 मिनिटांनंतर सगळं बदललं. मधुरिमा राजे यांना मी देखील विनंती केली होती की तुम्ही माघार घेऊ नका. मी त्यांना थांबवतोय म्हटल्यानंतर महाराज स्वत: आले. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. त्यामुळे उमेदवारी मागे घेणं गरजेचं आहे, असं म्हणत त्यांनी मला सुनावलं, असं सुनील मोदींनी म्हटलं.

काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जायचं याबाबत विचारमंथन करण्यात आलं. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून मधुरीमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. या बैठकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी यांनी प्रतिक्रिया दिलाी आहे.