मोठी बातमी ! कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा तुरुंगाच्या बाहेर

0
313

पिंपरी,दि ४ (पीसीबी)- बहुचर्चित खंडणी प्रकरणी गजा मारणे याला जमीन मंजूर झाला आहे. पुणे पोलिसांनी 169 नुसार अहवाल सादर केल्यानंतर गजा मारणे याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. पुणे : कोरोना काळात कुख्यात गुंड याची जेलमधून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवत जंगी मिरवणूक काढली होती. त्यावरून पुणे पोलिसांनी गजा मारणे याला चांगलेच रडारवर घेतले होते. त्यामध्ये गेल्या दीड वर्षांपासून गजा मारणे पुन्हा कारागृहात गेला होता. 20 कोटीच्या खंडणी प्रकरणी गजा मारणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर साताऱ्यात गजा मारणे पोलिसांच्या ताब्यात सापडला होता. खरंतर शेयर ट्रेडिंगमध्ये गुंतवलेल्या चार कोटी रुपयांच्या बदल्यात गजा मारणे याने आणि त्याच्या टोळीने खंडणी मागितली होती.

त्यामध्ये 20 कोटी रुपयांची खंडणी करत व्यावसायिकाचे अपहरण करत मारहाण केल्याची घटना घडली होती. याच प्रकरणी पुणे पोलिसांनी गजा मारणे याच्यासह त्याच्या 14 साथीदारांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2022 मध्ये गजा मारणे याला त्यावेळी सताऱ्यातील वाई येथे वकिलांना बेटण्यासाठी गेलेला असतांना अटक करण्यात आली होती.

विजयसिंह ठोंबरे यांच्या फार्म हाऊसवर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गेलेला असतांना पुणे पोलिसांनी सापळा रचत अटक केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याचे बोलले जात होते गजा मारणे हा फरार होता मात्र त्यापूर्वी गजा मारणे याचे साथीदार सचिन घोलप, हेमंत पाटील, अमर किर्दत, फिरोज शेख, रुपेश मारणे, संतोष शेलार ,मोनिका पवार, अजय गोळे, नितीन पंगरे, प्रसाद खडांगळे यांच्यावर मोक्काची अंतर्गत कारवाई केली जाणार होती त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे आता गजा मारणे याच्यावर इतके सर्व गंभीर गुन्हे दाखल असतांना गजा मारणे याला जमीन मंजूर झाला आहे. त्याच्यावर कठोर कारवाई होत असतांना पुणे पोलिसांनी कारवाईचा फास ढिला केल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे पुणे पोलिसांवर राजकीय दबाव तर नाही ना? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. पुणे पोलिसांनी 169 नुसार रिपोर्ट सादर केला असून त्यानंतर कोर्टाने गजा मारणेला जमीन मंजूर केला आहे. त्यामुळे अचानक ही कार्यवाही झाल्याने पुण्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.