मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भाजपकडून दोन मोठ्या ऑफर; मुख्यमंत्रिपद भाजपकडेच

0
2

मुंबई, दि. 27 (पीसीबी) : महाराष्ट्राच्या 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ काल संपला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. असं असताना नवीन सरकारच्या सत्ता स्थापनेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. असं असताना एकनाथ शिंदे हे मुख्यटमंत्रिपदावर दावा करत आहे. अशातच भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्याचं कळतं आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच असावेत यासाठी भाजप आग्रही आहेत. तसं भाजपने एकनाथ शिंदे यांना कळवल्याची माहिती आहे. शिवाय त्यांना उमुख्यमंत्रिपदाची किंवा केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर दिल्याचीही माहिती आहे.

मुख्यमंत्रिपदावर दाबा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजपने दोन मोठ्या ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचं उमुख्यमंत्रिपदाची किंवा मग केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिल्याचीही माहिती आहे. मात्र त्या ऑफरवर एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. काल दोन- तीन कार्यक्रमांना एकनाथ शिंदे हजर होते. पण त्यांनी नेहमी प्रमाणे माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. अजित पवार गटाने समर्थनाचं पत्रदेखील दिलं आहे.

महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु आहे. भाजपने 132 जागा जिंकल्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दिल्लीतून देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून देखील मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लढवली गेली आहे. लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याला पसंती दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं, अशी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत येण्यासाठी मोठी मदत झाली. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही योजना आल्याचा शिंदे गटाचा दावा आहे.