मोठी बातमी! अतिक अहमदच्या साथीदाराला नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
258

नाशिक, दि. १६ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील माफिया अतिक अहमदचा साथीदार गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी (१५ एप्रिल) आतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली. पोलीस वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी दोन्ही भावांची गोळ्या झाडून हत्या केली.

अशरफने मृत्यूपूर्वी गुड्डुचे नाव घेतले होते. गुड्डू मुस्लिम हा तोच व्यक्ती आहे. ज्याने उमेश पालच्या हत्येवेळी एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट घडवून आणले होते. गुड्डू मुस्लिमला गुड्डू द बॉम्बर म्हणूनही ओळखले जाते. असदच्या एन्काउंटरनंतर गुड्डूला पकडण्याची मोहिम आणखी तीव्र झाली होती. त्याच्या एन्काउंटरचीही अफवा पसरली होती, पण नंतर यूपी पोलिसांनी ती फेटाळून लावली होती.