मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

0
218

पिंपरी, दि. ०७ (पीसीबी) –  मोहननगर, काळभोरनगर, रामनगर महात्मा फुलेनगर या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यकारणी सदस्य गणेश लंगोटे यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मोहन नगर, काळभोर नगर ,रामनगर ,महात्मा फुले नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. त्यामुळे दुचाकी वरून जाणाऱ्या नागरिकांना जीविताला धोका निर्माण झाला आहे. दुचाकीस्वार आपल्या गाडीवरून जात असताना त्यांच्या मागे कुत्री भुंकतात व त्याचा पाठलाग करतात. अशावेळी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहेत यापूर्वी देखील काही घटना घडल्या आहेत.
या या गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालून आपल्या विभागाला योग्य सूचना देऊन या समस्येचे निराकरण करावे.