मोई गावात ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

0
488

मोई गावात रस्त्याच्या कडेला एमडी (मेफेड्रोन) विक्रीसाठी आलेल्या दोघांना सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.4) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

इस्तियाक अब्बास चौधरी (वय 26 रा.काळेवाडी), अब्दुलकरीम अब्दुल्ला चौधरी (वय 26 रा. चिखली) या दोघांना अटक केली असून त्यांचा साथीदार सोमनाथ चौधरी (रा. कुदळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी तिघांवर एमहाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इस्तियाक व अब्दुलकरीम हे दोघे 16 ग्रॅम वजनाचे एमडी विक्रीसाठी मोई गावातील भैरवनाथनगर येथे विक्रीसाठी आले होते. यावेळी पोलिसांनी सापळा रचून अटक केले. त्यांच्याकडून पोलिसांनी एमडी व 3 मोबाईल असा एकूण 3 लाख रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी सोमनाथ याच्याकडून हे एमडी आणले होते. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अंमली पदार्थ विरोधी पथक याचा पुढील तपास करत आहेत.