मैत्रिणीला लवकर का सोडत नाही म्हणत दुकानदाराला बेदम मारहाण

0
236
fight

दि २० मे (पीसीबी ) – कपड्याच्या दुकानात कामाला असलेल्या तरुणीच्या मित्राने दुकानदाराला बेदम मारहाण केली. माझ्या मैत्रिणीला दुकानातून लवकर घरी का सोडत नाही, असे म्हणत कामगार तरुणीच्या मित्राने व त्याच्या साथीदाराने मारहाण केली. ही घटना 18 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता शिंदेनगर बावधन येथे घडली.

अक्षय सुनीलराव सोळंखे (वय 28, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमय नागपुरे आणि त्याचा मित्र (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोळंखे यांचे शिंदेनगर बावधन येथे गो कलर्स नावाचे कपड्यांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात एक तरुणी काम करते. तिचा मित्र शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता सोळंखे यांच्या दुकानात आले. ‘तू माझ्या मैत्रिणीला लवकर का सोडत नाही. तिला तू सुट्टी का देत नाही, असे म्हणत अमय याने सोळंखे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर अमय याच्या मित्राने लोखंडी कड्याने सोळंखे यांना मारून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.