मैत्रिणीच्या विनयभंग प्रकरणी मित्रावर गुन्हा दाखल.

0
311

चाकण, दि. १७ (पीसीबी) – सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणाशी प्रेमसंबंध झाले. त्यानंतर त्याच्याशी संपर्क कमी केल्याच्या कारणावरून तरुणाने तरुणीला त्रास दिला. सोशल मीडियावर तिचा पाठलाग करून तिच्या घरच्यांना व मित्रांना धमकी दिली. हा प्रकार सन 2021 ते 3 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राधा चौक, म्हाळुंगे येथे घडला.

मोतीलाल चव्हाण (वय 21, रा. कात्रज. मूळ रा. हैद्राबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने रविवारी (दि. 16) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामवर फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख झाली. त्यांच्यात मैत्री होऊन प्रेमसंबंध झाले. त्यानंतर दोघांचे भेटणे, बोलणे झाले. मात्र कॉलेज सुरु झाल्यानंतर फिर्यादीने आरोपीसोबत बोलणे बंद केले. त्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीस 3 ऑक्टोबर 2022 रोजी राधा चौकात अडवले. शिवीगाळ करून तिचा मोबाईल फोन काढून घेतला. त्यावरून फिर्यादी यांच्या मित्र-मैत्रिणींना धमकी दिली. फिर्यादीच्या वडिलांना फोन करून, तुमची मुलगी कॉलेजच्या गेटच्या आत कशी येते तेच बघतो. तिला मारूनच टाकतो, अशी धमकी दिली. फिर्यादीला फोन करून पाठीमागे येऊन, जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.