मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावला

0
205

निगडी, दि. २३ (पीसीबी) – कामावर जाण्यासाठी मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या हातातून मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. २२) सकाळी निगडी गावठाण येथे घडली.

याप्रकरणी महिलेने दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पेट्रोल पंपावर काम करतात. शुक्रवारी सकाळी पावणे सहा वाजता त्या कामावर जाण्यासाठी त्यांच्या मैत्रिणीची वाट पाहत निगडी गावठाण मधील हनुमान मंदिराजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातून सात हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.