मेहुणीला मारहाण करून लुटले

0
82

पिंपरी, दि. २१ ऑगस्ट (पीसीबी) हिंजवडी,
मेहुणीला मारहाण करून लुटल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 21) सकाळी अकरा वाजता ताथवडे येथे घडली.

विक्रम चैनसिंग खेडेकर (वय 35, रा. गोवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ताथवडे येथे नित्यानंद मेहंदळे यांच्या फार्म हाऊस जवळून जात असताना त्यांच्या बहिणीचा पती आरोपी विक्रम तिथे आला. त्याने फिर्यादी सोबत झटापटी करून त्यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. फिर्यादी यांच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व हातातील तीन हजार रुपये रोख रक्कम असलेले पाकीट असा एकूण 18 हजारांचा मुद्देमाल ओढून जबरदस्तीने चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.