मेल आयडी हॅक करून कंपनीची 54 कोटी 39 लाख रुपयांची फसवणूक

0
216

 तळेगाव दाभाडे, दि, २८ (पीसीबी) – इकोकप इंडिया पेपरकप प्रा.ली.कंपनीच्या मालकिणीचा मेल आयडी हॅक करून त्यावरून मेल करत कंपनीची तब्बल 54 कोटी 39 लाख रुपयांची फसवणूक केली हा प्रकार 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत इकोकप इंडिया पेपरकप प्रा ली, नवलाख उंब्रे, ता. मावळ येथे घडला.

सुशील भीमराव गडलिंग (वय 46 , रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीच्या मालकीण अॅनालिसा फेरी यांचा मेल आयडी अज्ञाताने हॅक केला.अंनालिसा फेरी यांच्या मेलवरून फिर्यादी यांना मेल पाठवून गोलप बुबू सिंग इंटरप्राईजेस, मोहम्मद जुवेर इंटरप्रायजेस, सुरजसिंग इंटरप्रायजेस यांच्या अकाउंटवर रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितले. याद्वारे आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीची 54 कोटी 39 लाख 57 हजार 49 रुपयांची फसवणूक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.