मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

0
137

दि २८ एप्रिल (पीसीबी ) – पुणे मुंबई द्रुतगती मार्गालगत तळेगाव उर्से रस्त्यावर मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 27) दुपारी करण्यात आली.

जनार्दन दगडू पवार (वय 34, रा. वडगाव मावळ), शशिकांत बाळासाहेब मराठे (वय 25, रा. वराळे, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई द्रुतगती मार्गालगत तळेगाव उर्से रोडवर दोघेजण एमडी हा अमली पदार्थ विक्रीसाठी आले असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी सापळा लावून जनार्दन पवार आणि शशिकांत मराठे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख 73 हजार रुपये किमतीचा 25.40 ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.