मेदनकरवाडी मधून बुलेट चोरीला

0
394

चाकण, दि. १५ (पीसीबी) – मेदनकरवाडी मधून चोरट्याने बुलेट दुचाकी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली.

अजित जयभरात उमरीकर (वय 36, रा. टूलिप होम्स सोसायटी, मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 90 हजार रुपये किमतीची बुलेट दुचाकी (एमएच 14 / एचसी 1664) सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली. गुरुवारी रात्री नऊ ते शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या कालावधीत चोरटयांनी दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.