मेडिकल दुकानाचे शटर उचकटून मोबाईल आणि रोकड चोरीला

0
131

चिंचवड, दि. 13 (प्रतिनिधी)

मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भोईरनगर चिंचवड येथील जयशंकर मेडिकल दुकान येथे उघडकीस आली.

आदित्य मधुकर शिंदे (वय 25, रा. इंदिरानगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांचे भोईरनगर येथे जयवंत प्लाझामध्ये जयशंकर मेडिकल दुकान आहे. सोमवारी रात्री बारा वाजता त्यांनी कुलूप लावून दुकान बंद केले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटले. दुकानातून दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि 500 रुपये रोख रक्कम चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.