मेट्रो स्टेशन परिसरात चोरी करणाऱ्या महिलांवर गुन्हा

0
267

पिंपरी, दि. १२ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्टेशन परिसरातून अॅल्युमिनियम पट्ट्या चोरल्या. याप्रकरणी तीन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 ते 11 जानेवारी दरम्यान घडली.

कल्याणराव दौलतराव विधाते (वय 59, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्टेशनच्या खाली पिलर क्रमांक नऊ येथे लावलेल्या अॅल्युमिनियमच्या सहा हजारांच्या दहा पट्ट्या तीन महिलांनी चोरून नेल्या. तसेच 11 जानेवारी रोजी सायंकाळी पुन्हा पट्ट्या चोरण्याचा महिला प्रयत्न करीत होत्या. त्यावेळी त्या महिलांना नागरिकांनी हटकले असता त्या पळून गेल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.