मुंबई, दि.९ (पीसीबी)- मुंबई, दि.९ (पीसीबी)- राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व घटकांना खूश ठेवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शेतकरी, कामगार, कारखानदार, महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, बेरोजगारांसह जाती धर्माचा आणि संत महात्मायंच्या स्मारकांसाठी घोषणांची खैरात आहे. सर्व महत्वाच्या घोषणांची गोषवारा मुद्दे पुढीलप्रमाणे आहे.
मेट्रो प्रकल्प….
– मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला
मुंबईतील नवीन प्रकल्प
– मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी
– मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये
– मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये
– नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी
– पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर
– अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो
रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण
– नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
– सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये
– नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार
– सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल
– 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी