– ५०० चौ.फुटाच्या घरांना मालमत्ताकर माफी, रोज पाणी, टँकरमुक्त शहर, वादग्रस्त डिपी रद्द करणार
– लाडक्या बहिणींना ५ लाखाचे बिनव्याजी कर्ज, PMC च्या धर्तीवर शहरी गरीब आरोग्य योजनेला PCMC मध्ये सुरुवात
पिंपरी, दि.११ – मोफत मेट्रो, पीएमपीएल बस प्रवास,विद्यार्थ्यांना डेटासह टॅबलेट, ५०० चौ.फुटाच्या घरांना मालमत्ताकर माफी, रोज पाणी, टँकरमुक्त शहर, वादग्रस्त डिपी रद्द करणार, लाडक्या बहिणींना ५ लाखाचे बिनव्याजी कर्ज, खड्डेमुक्त शहर आदी आश्वासने राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड हमीपत्रात दिली आहेत. PMCM हद्दीतील नागरिकांसाठी शहरी गरीब आरोग्य योजना,या नवीन योजनेचा त्यात समावेश आहे. या योजनेत वैद्यकीय उपचारांसाठी ५ लाखापर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या व अशा अन्य संकल्पनांचा समावेश असलेले हमीपत्र,PCMC राष्ट्रवादी काँग्रेसने, महापालिका निवडणुकीसाठी ‘संकल्प सात, पुन्हा सुरवात’ या नावाने नागरिंकाची मागणी विचारात घेऊन प्रसिध्द केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार य़ांनी त्याचे प्रकाशन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ.अमोल कोल्हे, महाराष्ट्र राज्य विधानसभा उप अध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे, आमदार श्विलास लांडे यांच्या प्रमुख तसेच शहराध्यक्ष योगेश बहल, शहराध्यक्ष तुषार कामठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नळाद्वारे रोज पाणी, टँकरमुक्त, खड्डेमुक्त पीसीएमसी, स्वच्छता अभियानात भारतात प्रथम स्थान, हायटेक आरोग्य सुविधा, पीसीएमसी मॉडेल स्कूल आणि पिंपरी चिंचवडकरांप्रति उत्तरदायित्व आदी सात हमी देणारे हे हमीपत्र पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सत्ता येताच या सर्व आश्वासनांची मी पूर्तता कऱणार, हा अजितदादाचा वादा आहे, असे पवार यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, प्रचार प्रमुख माजी आमदार विलास लांडे पाटील, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे, गोरक्ष लोखंडे, सारंग कामतेकर, फझल शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होत.
नळाद्वारे रोज पाणी –
सर्व प्रभागांतून नळामधून उच्च दाबाने दररोज पाणीपुरवठा केल जाईल. यामुळे उंच भागत राहणाऱ्या नागरीकांना पुरेसे पाणी मिळेल आणि टँकरपासून कायमची मुक्तता मिळेल. पाणीपुरवठा अवेळी असल्याने नागरिक त्रस्त आहेत, त्यावर तोडगा म्हणून निश्चित वेळापत्रक तीन महिने अगोदर जाहीर केले जाणार आहे.
टँकरमाफियांचे १०० टक्के उच्चाटन –
शहरातील ५००० हाऊसिंग सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्यांना लाखो रुपये खर्च करून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. या टँकर माफियांचे १०० टक्के उच्चाटन कऱण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात एक सामुदायिक विहीर उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून दीर्घकालीन शाश्वत कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
पाणी गळती रोखण्यासाठी ३,५०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्यांचा श्रेणी,धार केला जाणार आहे. गळती दुरुस्तीसाठी १० मोबाईल सेन्सर व्हॅन्स सज्ज ठेवल्या जातील.
पवना प्रकल्प मार्गी लावणार –
पवना प्रकल्पाचे रखडलेले पईपलाईनचे काम मार्गी लावण्याचे अत्यंत महत्वाचे आश्वासन या हमीपत्रात आहे. भामा आसखेड प्रकल्पातूनही पाईपद्वारे पाणी आणण्याचा प्रलंबित काम तातडिने पूर्ण केले जाणार आहे.
मेट्रो, पीएमपीएमएल प्रवास मोफत –
दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, परवडणारा आणि सुलभ होण्यासाठी सर्वांसाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल बस प्रवास मोफत उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे कुटुंबावरील आर्थिक भार कमी होईल. शिक्षण आणि कामाच्या ठिकाणी जाणे सुलभ होईल. सार्वजनिक वाहतूक वापरास प्रोत्साहन मिळेल आणि खाजगी वाहनांवरचे अवलंबित्व कमी होईल, शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मेट्रोलाईनसाठी लास्ट माईल कनेकटिव्हिटी व फिडरबस सेवा यासाठी उपलब्ध होणार आहे.
५०० चौ.फुटाच्या घरांची मालमत्ता करातून सुटका – निवडणूक होताच १ एप्रिल २०२६ पासून सर्व मध्यमवर्गीयांच्या मालकिच्या ५०० चौरस फुटापर्यंत्या घरांचा मिळकतकर माफ होणार आहे. लहान घरमालक, जेष्ठ नागरीक आणि मध्यवर्गीय कुटुंबांना थेट याचा लाभ मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट –
विद्यार्थयांना डेटा प्लानसह मोफत टॅबलोट मिळणार आहे ज्यामुळे शिक्षण कोणत्याही खर्चाशिवाय किंवा कनेक्टिव्हीटीच्या अडथळ्याशिवाय सुरू राहणार आहे.
५ लाखा पर्यंत बिनव्याजी कर्ज –
रोजगाराभिमुख कोशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाडक्या बहिणींनासाठी स्वयंरोजगार सुरू कऱण्यासाठई किंवा विस्तारासाठी ५ लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.
डिपी रद्द करणार –
शहरात सर्वात वादग्रस्त ठरलेला सुधारीत शहर विकास आराखडा रद्द करण्याचे ठोस आश्वासन अजित पवार यांनी हमीपत्रात दिले आहे.
बर्नवार्ड, कर्करोग रुग्नालय
हायटेक आरोग्य सुविधा –
बर्नवार्ड, कर्करोग रुग्नालय तसेच सुपरस्पेशालिटी ह़स्पिटल, मेडिकल कॉलेज, टेलिमेडिसिन सेवा, व्यापक आरोग्य विमा, पोर्टेबल डायग्ऩस्टिक युनिटस MRI, CT स्कॅन अत्यल्प दरात उपलब्द करून देण्याची हमी दिली आहे. पुणे महापालिकेप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरातील गरीब रुग्णांसाठी सामान्य आजार उपचारासाठी २ लाख तर दुर्धर आजारांच्या उपचारासाठी ५ लाखाची मदत देण्याचे आश्वासन हमी पत्रात दिले आहे.
१०० मॉडेल स्कूल –
महानगरपालिका १०० मॉडेल शाळांना मंजुरी देईल, निवडक शाळांचे श्रेणीवर्धन करेल आणि लोकसंख्येच्या क्लस्टरनुसार टप्प्याटप्प्याने सीबीएसई आणि आयसीएसई मानांकनुसार नवीन शाळा सुरू करेल. या शाळांमध्ये आधिनिक वर्गखोल्या, विज्ञान आण संगणक प्रयोगशाळा, प्रशिक्षित शिक्षक, मराठीच्या पायाभूत ज्ञानासह इंग्रजी माध्यमाचे शइक्षण, क्रीडा सुविधी आणि मुलभूत सुविधा उपलब्ध असतील. तोणतेही अतिरिक्त शुल्क नाही, प३भाग निहाय आणि पारदर्शन यामुळे माहापालिका खर्चात स्तरावरील शिक्षण सुनिश्चित होईल, ज्यामुळे महागड्या खासगी शाळांवरील अवलंबित्व कमी होईल.
धार्मिक स्थळांचे संरक्षण –
विकास आराखड्यातील धार्मिक स्थळांच्या आजूबाजुला कायमस्वरुपी संरक्षक क्षेत्र निश्चित करण्यात येईल. विकासाच्या नावाखाली शतकानुशतके जपलेल्या व ज्यांचे संरक्षण केल्याने भावी पिढ्यांसाठी त्या त्या धर्माचा वारसा जतन करणे शक्य होणार आहे अशा श्रद्धास्थांनावर आघात होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.
झोपडपट्टी विस्थापन नव्हे पुनर्वसन –
नवीन विकास आराखड्यात पीसीएमसी मधील झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या नागरिकांच्या हक्कांना प्राधान्य दिले जाईल. विस्थापन किंव पाडकामाएवजी झोपडपट्टी पुनर्वसनावर भर देण्यात येईल. यासाठी जलद मंजुरी प्रक्रीयेसह समर्पीत एसआरए (झोपडपट्टी पुनर्वनस प्राधिकरण) कक्ष स्थापन केला जाईल ज्या मार्फत ३ वर्षांच्या आत प्रकल्प पूर्ण कऱण्याचे उद्दिष्ट असेल. ३ वर्षांत प्रकल्प पूर्ण न झाल्यास विस्थापितांना देण्यात येणाऱ्या दरमहा भाड्याच्या दुप्पट रक्कम देण्याची तरतूद असेल.
सात नवीन कनेक्टिव्हिटी –
पुढच्या दोन वर्षांच्या कालावधीत कनक्टिव्हीटीचे आठ प्रकल्प पूर्ण केले जातील.
निगडी – रावेत – वाकड टेक कॉरीडॉर – आयटी कर्मचाऱ्यांना होणाऱा वाहतूक कोंडीचा त्रास कमी कऱण्यासाठी आणि महामार्गावरील अडथळे टाळण्यासाठी मेट्रोसहीत एलिव्हेटेड रोड कऱणार.
मोशी- चिखली-तळवडे ग्रोथ कॉरीडॉर –
वेगाने वाढणाऱ्या निवासी पट्ट्यांसाठी तळवडे चौक, चिखली चौक ते कुदळवाडी चौक ते देहू-आळंदी रस्ता येथे उड्डाणपूल बांधणार आणि मोई पुलाची रुंदी वाढवणार.
पिंपरी चिंचवड- भोसरी ओद्यगिक लूप –
नाशिकफाटा ते नारायणगाव या राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधिन उन्नत पुलाला जोडणारे रस्ते महापालिका बांधणार.
काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्त्यावरील तापकिर चौक, एमएमएस हायस्कूल चौक बीआरटीएस कॉरीडॉर नंबर तीन उड्डाणपूल करणार.
पिंपरी डेअरी फार्म नवीन पूल ते पुण्याकडे जाण्यासाठी व्हेहिक्युलर अंडरपास बवविणार.
नदिच्या कडेने तळवडे ते चिखली डीपी रस्ता कऱणार.
वाकड-पिंपळे सौदागर- नाशिकफाटा- भोसरी- चाकण नवीन मेट्रो लाईन सुरू कऱणार.
डांगे चौकातील ग्रेड सेपरेटर- बिर्ला हॉस्पिटल – थेरगाव फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याला पुढे वाढवणार. यामुळे हिंजवडी भूमकर चौकाकडून येणाऱ्या आयटीएन्सला चिंचवडगाव व भोसरीकडे जाणे सुलभ होणार आहे.
मालमत्तांचे कायदेशीर संरक्षण –
सर्व कायदेशीररित्या विकसीत मालमत्तांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल. ज्यांच्याकडे बांधकाम परवाने, मालमत्ता कर पावत्या व महसूल मालकी नोंदी आहेत अशा कोणत्याही मालमत्तांचे पाडकाम केले जाणार नाही.
गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रीया अर्ज दाखल केल्याच्या ३ महिन्यांत पालिकेने कार्यवाही पूर्ण न केल्यास कायदेशीर अर्ज मान्य झाला असे समजण्यात येईल. सदर प्रक्रीया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक कऱण्यात येईल.
कला, क्रीडा क्षेत्रासाठी कृती आराखडा –
कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राल झळाळी आणण्यासाठीचा कृती आराखडा सात दिवसांत पिंपरी चिंचवडकरांसमोर ठेवणार








































