मेट्रो निगडी पर्यंत निर्णयाचे मनसेकडून जल्लोषात स्वागत

0
270


निगडी, दि. २३ (पीसीबी) – मेट्रो पिंपरी पासून पुढे निगडी पर्यंत करण्याच्या निर्णयाचे मनसेने स्वागत केले असून भक्ती शक्ती चौकात साखर वाटून आनंद व्यक्त केला. निगडी मेट्रोची मागणी मनसेचीच असल्याचे सांगत मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केंद्र सरकारला या निर्णयाबद्दल धन्यवाद दिले.

प्रसिध्दीपत्रकात चिखले म्हणतात, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरीकांना मेट्रो प्रवासाचा लाभ मिळावा , व निगडी पर्यंत मेट्रो असवी अशी सर्व शहरवासीयांची इच्छा होती परंतु पहिला टप्पा पिंपरी ते दापोडी असा झाला व काम ही पुर्ण झाले त्यामुळे निगडी पर्यन्त मेट्रो येईल का नाही अशी भिती निगडी, आकुर्डी , व चिंचवड मधिल सर्वसामान्य नागरीकांना होती. हेच हित लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व पदाधिकारी यांनी २०१६ – २०१७ पासुन निगडी पर्यन्त मेट्रो साठी आंदोलने मोर्चे व्दारे आपण केंद्र व राज्य शासन यांच्या विरुद्ध आंदोलने उभी केली व लक्ष केंद्रीत केली.


आज खऱ्या अर्थाने त्या प्रयत्नांना यश आले निगडी पर्यन्त मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आज केंद्र सरकारची मान्यता भेटली आहे . निगडी पर्यंत च्या मेट्रोच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाची मान्यता भेटली आहे ,पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके असतील. या विस्तारित मार्गासाठी होणाऱ्या खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल. हा प्रस्तावित कॉरिडॉर 4.13 किमी लांबीचा असून तो एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणून बांधला जाईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे खर्च 910.18 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आता लवकरच निगडीपर्यंतच्या मेट्रो कामाला सुरुवात होईल. वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प फायदेशीर ठरणार
आम्ही केलेल्या मागणीला खऱ्या अर्थाने यश आले आहे राज्यसरकार व केंद्र सरकाराचे व विविध संघटनाचे आम्ही आभारी आहोत