पिंपरी.दि,११ (पीसीबी) – मेट्रोमोनीयल साईटवरून खोटी ओळख दाखवून लग्नाचे आमिष दाखवत वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडू 18 लाख 46 हजार रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार मे ते 1 सप्टेंबर 2023 मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे घडला.
याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 9) फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9491495287, 7420995287 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख जीवनसाथी एप वरून झाली. आरोपीने त्याचे नाव हंस राज उर्फ अकुल मीना असे सांगितले. त्याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून नवीन घर खरेदी करण्यासाठी बँकेचे होम लोन, पर्सनल लोन, फायनान्स द्वारे कर्ज काढण्यास सांगितले. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून शेअर मार्केट मध्ये झालेल्या नफ्यातून लोकांना उधार पैसे द्यायचे, असे सांगितले. घरातील सामानासाठी म्हणून फिर्यादीकडून एकूण 18 लाख 46 हजार 736 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.