मेट्रोच्या खोदकामात बॉम्ब, बाणेर परिसरात खळबळ

0
396

बाणेर, दि. ४ (पीसीबी) – पुण्यातील मेट्रो मार्गिकेचे काम वेगात सुरू आहे. या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या मार्गिकेचे खोदकाम सुरू असताना सोमवारी जुने हातबॉम्ब सापडले आहेत. बाणेर परिसरात सापडलेल्या या हातबॉम्बने पुण्यात खळबळ उडाली. दरम्यान, माहिती मिळताच पोलिस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेचे काम वेगात सुरू आहे. सध्या या मार्गिकेवरील खांब उभे करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. दरम्यान, बाणेर परिसरातील खोदकाम करताना मेट्रो कर्मचाऱ्याना जुने हातबॉम्ब आढळून आले. हा प्रकार सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला. बॉम्ब दिसताच कामगारांनी तेथील अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी हा प्रकार पोलिस प्रशासनाला कळवला.

हातबॉम्ब सापडल्याची माहिती मिळताच चतु:शृंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तात्काळ बाॅम्बशोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण करण्यात आले. सापडलेले हातबाॅम्ब जुने असल्याने धोका वाढतो. दरम्यान, हे हात बाॅम्ब ब्रिटिशकालीन असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे बीडीडीएस पथकातील अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी बाॅम्ब सुरक्षितस्थळी हलविले.