मेटे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल नातेवाईकांना शंका

0
274

– पत्नी ज्योती मेटे करणार चौकशीची मागणी

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचं रविवारी रस्ता अपघातात निधन झालं. या अपघाताबद्दल शंकेची वातावरण आहे. पोलिसांकडून अपघात होता की घातपात या दृष्टीने पोलिसांनी तपास केला जात आहे. मेटे यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून या अपघाताबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हटल्यानंतर आता आणखी एका नातेवाईकाने मेटेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली आहे.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या रस्ता अपघातात निधन झाले , दरम्यान त्याच्या अपघातानंतर त्यांना बराच वेळ मदत मिळाली नाही असा आरोप केला जातोय. या दरम्यान विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी देखील नवीन आरोप केलेत.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण म्हणाले आहेत की, या दुःखातून आम्ही सावरलो नाही, मात्र ३ दिवसानंतर आम्ही मीडिया समोर यायचे ठरवले. हा घातपात का अपघात हे निष्पन्न झाले नाही. ड्रायव्हर जो आहे तो वेग वेगळे स्टेटमेंट देतो आहे, असे ते म्हणाले.

अपघात झाल्यानंतर मला फोन आले. साहेबांचे ३ ड्रायव्हर आहेत. मला माहित नव्हतं कोण ड्रायव्हर आहेत ते, एकनाथ कदम हा ड्रायव्हर आहे असे कळले, तर मी त्याला मी फोन केला. मी त्याला त्यांचा लोकेशन विचारले. रोज फिरणारा ड्रायव्हर मला विचारात होता की तुम्ही कोण बोलतंय म्हणून मी त्याला लोकेशन सांग असे सातत्याने विचारत होतो पण तो नुसता रडत होता.तिथे असणाऱ्या एका तिऱ्हाईत व्यक्तीला त्याने फोन दिला आणि त्यांनी मला सांगितले की तिथे अँब्युलन्स आली आहे. त्या व्यक्तीने मला सांगितले की ड्रायव्हरला काही झाले नाही पोलिस जखमी आहेत पण साहेब जागेवर गेले आहेत, असे सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे त्यांनी सांगितले की साहेबांच्या पायाला, डोकं लागलं आहे असे ड्रायव्हर ने मला सांगितले, हा ड्रायव्हर रोज सातत्याने स्टेटमेंट बदलत चालला आहे, याला घात का अपघात म्हणायचे. सरकार ने समिती नेमली पण त्याचा पुढे काहीच झालं नाही. हा घात आहे का अपघात हे आम्हाला कळायला हवे. आम्ही या दुःखातून सावरलो नाही. सर्व चुकी ड्रायव्हर एकनाथ कदम यांची आहे. सी सी टिव्ही मध्ये आम्हाला कुठेच दिसली नाहीत. हा ड्रायव्हर सतत कोणाला फोन करत होता. ड्रायव्हरचा संपर्क कोणाशी होता त्याचे कॉल डिटेल्स हवेत, त्याने लोकेशन का नाही सांगितले त्याला नेमका काय प्रोब्लेम होता, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.