मेंढ्यांच्या तळावरून चार मेंढ्या, एक बोकड चोरीला

0
318

रावेत, दि. २८ (पीसीबी) – रावेत येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेत असलेल्या मेंढ्याच्या तळावरून अज्ञातांनी एक बोकड आणि चार मेंढ्या चोरून नेल्या. ही घटना 19 आणि 24 एप्रिल रोजी घडली.

याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मेंढ्याच्या तळावरून 19 एप्रिल रोजी 10 हजारांचे एक बोकड चोरीला गेले. त्यानंतर 24 एप्रिल रोजी फिर्यादी यांच्या कळपातून 36 हजारांच्या तीन मेंढ्या आणि त्यांच्या जावयाच्या कळपातून 10 हजारांची एक मेंढी चोरीला गेली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.