मेंढपाळांचा घोडा चोरीला

0
359

देहूरोड, दि. ०३ (पीसीबी) – देहूरोड येथील बुद्ध विहारासमोर मोकळ्या जागेत मेंढपाळाने बांधलेला घोडा अज्ञातांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी उघडकीस आली.

काळू साधू मदने (वय 22, रा. मूरटी मोडवा, ता. बारामती) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मेंढपाळ असून त्यांनी त्यांचा घोडा चरण्यासाठी बुद्ध विहार जवळील मोकळ्या जागेत बांधला होता. या दरम्यान चोराने घोडा चोरून नेला आहे. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात 1 लाख रुपयांचा घोडा चोरल्याची तक्रार दाखल केली असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.