मृतदेहाची अदलाबदल झाल्याने वायसीएमचमध्ये गोंधळ; अधिष्ठत्याच्या दालनाची तोडफोड?

0
210

पिंपरी दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूगाणालयात मृतदेहाची आदलाबदल झाल्याने गोंधळ झाला. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या दालनाची तोडफोड केली.

वायसीएम मधील डेडहाऊसमधून एका नातेवाईकांनी आपल्या नातेवाईकाचा समजून घाईगडबीत दुसराच मृतदेह नेला. पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील गेले. पण, तो मृतदेह दुस-याच व्यक्तीचा होता. ज्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्या व्यक्तीचे नातेवाईक मृतेदह नेण्यासाठी आज वायसीएम रुग्णालयात आले होते. पण, त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेह रुग्णालयात नव्हता. त्यांचा नातेवाईकाचा मृतदेह दुस-यांनी नेल्याचे समजले.

मृतदेहाची अदलाबदल झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या दालनाकडे धाव घेतली. त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. चिडलेल्या नातेवाईकांनी वाबळे यांच्या दालनाची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांची कुमक वाढविली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ देखील रुग्णालयात गेले आहेत. कोणाच्या चुकीमुळे मृतदेहाची अदलाबदल झाली. दोषींवर महापालिका काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.