दि . 12 ( पीसीबी ) – एकिकडे हिंदु- मुस्लिम असे द्वेषाचा राजकारण सुरू असताना दुसरीकडे शेजारच्या मुस्लिम देशात सर्वात मोठा गुंतवणूकदार करणारा आपला भारत देश आहे. भारताचा प्रभाव जगभरात वाढत आहे. तसेच भारत विविध देशांमध्ये गुंतवणूक करत आहे. जगात पर्यटन आणि सर्वात उंच इमारतींसाठी युनायटेड अरब अमीरातमधील दुबई शहर प्रसिद्ध आहे. या दुबईत भारत सर्वात मोठा गुंतवणूकदार बनला आहे. दुबई सरकारच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारताने सन 2024 मध्ये दुबईत 3.018 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
दुबईची अर्थव्यवस्था आणि पर्यटक विभागच्या दुबई एफडीआय मॉनिटरनुसार, दुबईत सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे. भारताने दुबईत 21.5 टक्के गुंतवणूक केली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेने 13.7 टक्के, फ्रॉन्सने 11 टक्के, यूनाइटेड किंगडम 10 टक्के गुंतवणूक दुबईत केली आहे. स्वित्झर्लंडची गुंतवणूक 6.9 टक्के आहे.
विकसित देशांच्या पुढे भारत
सन 2023 मध्ये दुबईमध्ये भारताची गुंतवणूक 589 दशलक्ष डॉलर्स होती. ती 2024 मध्ये चांगलीच वाढली आहे. ती आता 3.018 अब्ज डॉलर्स झाली आहे. यामुळे भारत दुबईतील पहिल्या क्रमांकाचा गुंतवणूकदार देश बनला आहे. दुबईतील गुंतवणुकीच्या यादीत भारताचे नाव अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीनसह सर्व विकसित देशांच्या पुढे आहे. 2024 मध्ये ग्रीनफिल्ड एफडीआय प्रकल्पांची कामगिरी 2023 च्या 73.5 टक्के इतकी होती. त्याच वेळी, पुनर्गुंतवणूक एफडीआय प्रकल्प 2023 मध्ये 1.2 टक्क्यांवरून 2024 मध्ये 3.3 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
सन 2023 मध्ये 249 प्रकल्पांमध्ये भारताने गुंतवणूक केली. ती वाढून 2024 मध्ये 275 झाली आहे. प्रकल्पाच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताच्या गुंतवणुकीत सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. या क्षेत्रात 26.9 टक्के गुंतवणूक भारताने केली आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रात 23.6 टक्के, उत्पादन क्षेत्रात 9.8 टक्के, खानपान क्षेत्रात 8.4 टक्के तर रिअल एस्टेटमध्ये 6.9 टक्के गुंतवणूक भारताने केली आहे.
रिपोर्ट आल्यानंतर दुबईचे क्राउन प्रिंस शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी सांगितले की, दुबई शहराने जगातील मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. रॅकींगमध्ये जगभरात दुबई पहिल्या क्रमांकावर आहे. युएसईचा विकास वेगाने होत असल्याचा हा पुरावा आहे. दुबईची ताकद जगाने ओळखली आहे.