दि . १ ( पीसीबी ) – राष्ट्रवादी–महायुती सरकारच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आमदर शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी मुळशी, भोर आणि राजगड तालुक्यातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचं मा. अजितदादांनी स्वागत करून सर्वांशी संवाद साधला.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालणारा, सर्वसमावेशक हिताचं भान जपणारा पक्ष आहे. आम्ही काम करताना कोणताही जात-पंथ-धर्माचा भेदभाव करत नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांनी देखील सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका जोपासायची आहे.” असे प्रतिपादन यावेळी मा. अजितदादांनी केले.
आपलं राष्ट्रवादी-महायुती सरकार राज्यातील तमाम जनतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या न्याय-हक्कासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. राज्यात सर्व पायाभूत सुविधांचा विस्तार, सामाजिक योजनांची अंमलबजावणी आणि आधुनिकतेची जोड या साऱ्यांमधून आपण शाश्वत महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पावलं टाकत आहोत. या प्रवासात आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग राहावा व महाराष्ट्र हिताचं कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडावं, अशी अपेक्षा मा. अजितदादांनी व्यक्त केली.