मुळशीतील अवघड श्रेणीतील तैलबैला कातळभिंत सागरमाथा गिर्यारोहकांनी केली सर

0
26

भोसरी,दि.02 (पीसीबी)
सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रस्तरारोहण विश्वातील प्रसिद्ध व चढाई साठी अवघड श्रेणीतील तैलबैला कातळ भिंतीवर (गावाकडचा कडा) यशस्वी चढाई करण्यात आली, तैलबैला भिंतीची समुद्र सपाटीपासुन उंची 3 हजार 332 फुट इतकी आहे. तैलबैला किल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग असून, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील डोंगर रांगेत हा सह्याद्रीतील डाईकची रचना असलेल्या कातळभिंती स्थित आहे. अशी माहिती एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी दिली.
१ जानेवारी २०२५ च्या पहाटे ६ वाजता सर्व गिर्यारोहक चमू भोसरी मधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघाले. सकाळी लवकरच गिर्यारोहक चमु तैलबैलाच्या पायथ्याशी पोहचले. निसर्ग देवतेचे व कातळ भिंतीचे पूजन करून सकाळी १०:०० वाजता मुख्य चढाईस सुरुवात करण्यात आली. तैलबैला कातळभिंती समुहातील गावाकडील कडा हा सर्वात आव्हानात्मक व अवघड श्रेणीसाठी प्रसिद्ध आहे. या चढाई मोहिमेसाठी संपूर्ण तांत्रिक नियोजन तांत्रिक प्रमुख सत्यवान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. सर्वप्रथम अनिल पवळे याने चढाईस सुरुवात केली त्यावेळी त्याचा सुरक्षा रोप (बिले) शरद पवळे देत होता. अंगावर येणारी ९०° अंशतील खडी चढाई करत अनिल आणि शरद यांनी दोन स्टेशन बनवत या कातळ भिंतीच्या मार्गावर सुरक्षित चढाई केली. या नंतर मोहिमेचा नेता पांडुरंग शिंदे व लखन घाडगे यांनी यशस्वीपणे चढाई करत माथा गाठला.सर्वांनी सुरक्षित चढाई करत दुपारी ३:३० वाजता तैलबैला कातळ भिंतीचा माथा गाठला व ‘ जय भवानी जय शिवाजी, व ‘ हर हर महादेव’ अश्या घोषणा दिल्या.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने तैलबैला कातळ भिंतीवर आरोहण मोहिम यशस्वी करताना सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा संस्थेच्या वतीने देण्यात आल्या.
या मोहिमेचे नेतृत्व मोहिमेचे नेतृत्व पांडुरंग शिंदे यांनी केले व ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रविण हरपळे व एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या यशस्वी मोहिमेचे अभिनंदन श्री. अरुण बोऱ्हाडे यांनी केले.
अधिक माहिती साठी
प्रविण हरपळे 901173239
श्रीहरी तापकीर 9404415554