मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून तरुणाच्या घरावर हल्ला करत सामानाची तोडफोड

0
441

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरावर हल्ला करत घऱातील सामानांची तोडफोड केली आहे. ही घटना रविवारी (दि.४) चिंचवड येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पिंपरी पोलिसांनी मुलीच्या घरच्या ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाशी असलेल्या प्रेमसंबंधातून आरोपींची मुलगी पळून गेली या संशयातून आरोपींनी फिर्यादीच्या घरावर हल्ला केला. यामध्ये त्यांनी घराचे दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व घरातील साहित्याची तोडफोड करत ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.