मुलीला नदीत फेकेन, पवारांच्या संपर्कातील मुलीला दादांच्या मंत्र्यांचं टीकास्त्र

0
104

पिंपरी, दि. ०७ (पीसीबी) मुलीला नदीत फेकेन, जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीवर दादांच्या मंत्र्यांचं टीकास्त्र
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर नाव न घेता टीका केली. पक्षफोडी करणारा पक्षच आता माझं घर फोडण्याचं काम करतोय असं आत्राम यांनी म्हटलंय. पक्ष फोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचे काम करीत आहे, असा आरोप नाव न घेता अजित पवार गटाचे नेते व अहेरीचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर केला आहे. एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल,असे धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. ते चंद्रुपरात बोलत होते.

धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री ही परस्पर विरोधी शरद गटाकडून लढणार असल्याचा दावा केला गेला. या दाव्यामुळे वडिलांविरुद्ध मुलगी मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. पण जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार आहे. माझ्याकडे दुधारी तलवार आहे, माझ्या वाटेला गेलात तर म्यानमधून तलवार बाहेर काढणार. एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. आत्राम घराणं हलगेकर (मुलगी आणि जावई) यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही.
एक गेलं तरी संपूर्ण कुंटुंब माझ्यामागे : धर्मरावबाबा आत्राम

आत्राम म्हणाले, जे माझ्या खुर्चीवर बसण्याच पाहतील त्यांना बाजूला करण्याचे काम मी करणार आहे.मी या भूमीतील गरीब आणि श्रीमंत अशा सर्व लोकांना सर्वांना समान न्याय दिला आहे. मी सतत काम करत आलो आहे. आता हे मध्येच येऊन हे अशा प्रकारचे वातावरण तयार करत असतील तर त्यांना वाट लावायचे काम आपल्याला करायचे आहे. मी इमाने इतबारे काम केले. 50 वर्षे या भूमीचे रक्षण करण्याचे काम केले आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी काम करत राहणार आहे. एक गेला तरी कुटुंबाची संपूर्ण फौज आज माझ्यामागे उभी आहे