मुलीला घेऊन जा म्हटल्याने पत्नीला मारहाण

0
3

शिरगाव, दि. 12 (पीसीबी) : मुलीला घेऊन जा म्हटल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. ११) पहाटे एक वाजताच्या सुमारास शिरगाव येथील अभिमान सोसायटी मध्ये घडली. मनोज बबन पवार (रा. निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपी पतीला मुलीला सोबत घेऊन जाण्यास सांगितले होते. त्या रागातून मनोज पवार याने पत्नीला शिवीगाळ करून हाताने व कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. ‘तू जर आमची कुठे तक्रार केली तर तुला पाहून घेतो’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.