उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये हादरवून टाकणारी घटना घडली. एका महिलेने आपल्या मुलीच्या लग्नाला ९ दिवस शिल्लक राहिले असतानाच मोठं कांड केलं. ही महिला आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली. ऐवढंच नाही तर जाता जाता या महिलेने मुलीच्या लग्नासाठी लागणारे पैसे आणि दागिने सर्वकाही घेऊन पळून गेली. या महिलेने नात्याच्या सर्व सीमा ओलांडल्या. याप्रकरणी कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली. सध्या पोलिस महिला आणि तिच्या होणाऱ्या जावयाचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिगढच्या मडराक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये ही घटना घडली. या गावामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलीचे लग्न होणार होते. या तरुणीचे लग्न अलिगढच्या दादों पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये राहणाऱ्या तरुणासोबत होणार होते. १६ एप्रिल रोजी हे लग्न होणार होते. दोन्ही घरी लग्नापूर्वीच्या सर्व विधी देखील सुरू झाल्या होत्या. पण त्यापूर्वीच दोन्ही कुटुंबीयांना धक्का देणारी घटना घडली. ३ एप्रिल रोजी मुलीच्या आई-वडिलांकडून होणाऱ्या जावयाला एक मोबाइल गिफ्ट करण्यात आला. त्यानंतर सासू दररोज आपल्या होणाऱ्या जावयासोबत फोनवर बोलू लागली. त्यांच्या गप्पा ऐवढ्या रंगल्या की ते लपून छपून फोनवर बोलू लागले.
रविवारी नवरदेव आपल्या कुटुंबीयांना लग्नाची कपडे खरेदी करण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका असे देखील त्याने वडिलांना सांगितले. ऐवढं सांगितल्यानंतर त्याने फोन कट केला. मुलाचे हे बोलणं एकून त्याच्या वडिलांना धक्का बसला. पण आपला मुलगा संध्याकाळपर्यंत परत घरी आला नाही त्यामुळे त्यांना भीती वाटू लागली.
मुलगा संध्याकाळपर्यंत घरी येईल असे त्याच्या कुटुंबीयांना वाटत होते. पण त्याचा फोन बंद लागत होता त्यामुळे तरुणाच्या वडिलांची चिंता वाढली. त्यांनी सर्वांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना कळाले की, ज्यादिवशी त्यांचा मुलगा बेपत्त झाला त्याचदिवशी त्याची सासू देखील घरातून बेपत्ता झाल्याचे कळाले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी घरातील कपाट चेक केले असता त्यांना लग्नासाठी लागणारे पैसे आणि दागिने ठेवलेले गायब होते. या घटनेची उत्तर प्रदेशमध्ये सगळीकडे चर्चा होत आहे. होणाऱ्या जावयासोबतच सासू पळून गेल्याची चर्चा होऊ लागली आहे.