मुलासोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात चोरट्यांनी साधला डाव

0
65

पिंपरी,दि. 25 (पीसीबी) : मुलासोबत दुचाकीवरून चाललेल्‍या महिलेच्‍या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरील दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. २३) रात्री सव्‍वाआठ वाजताच्‍या सुमारास पूर्णानगर, चिंचवड येथे घडली.

याबाबत पूर्णानगर, चिंचवड येथे राहणार्‍या ४३ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आपल्‍या मुलासोबत दुचाकीवरून चालल्‍या होत्‍या. त्‍या पूर्णानगर येथील मनपा कार्यालया जवळ आल्‍या असता पाठीमागून एका दुचाकीवरून आलेल्‍या दोन चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्‍या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे सोन्‍याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.