मुलाने मारहाण केली म्हणून आईला मारहाण

0
171

हिंजवडी, दि. २० (पीसीबी) – महिलेच्या मुलांनी मारहाण केल्याच्या रागातून सहा जणांनी मिळून महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 18) रात्री हुतात्मा चौक बावधन येथे घडली.

प्रतिक कांबळे, अनिकेत वाळके आणि चार महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलांनी आरोपी प्रतिक याला मारहाण केली होती. याचा राग मनात धरून प्रतिक याने त्याच्या घरच्यांसह फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. फिर्यादीच्या पोटात लाथ मारून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.