मुलगी आणि जावयाचे भांडण सोडवायला आलेल्या सासऱ्याच्या गालाचा घेतला चावा; जावयावर गुन्हा दाखल

0
684

आळंदी, दि. ९ (पीसीबी) – मुलगी आणि जावयाचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सास-याच्या चेह-याला जावयाने चावा घेतला. तसेच जावयाने पत्नी आणि सास-याला मारहाण केली. ही घटना आळंदी येथे बुधवारी (दि. ८) रात्री नऊ वाजता घडली.

भरत अशोक साठे (वय ३५, रा. आळंदी. मूळ रा. लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भरत याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भरत याने फिर्यादी यांना कामाला जाण्यास विरोध केला. तसेच त्यावरून दोघांचे भांडण झाले. भरत याने उपरण्यात दगड गुंडाळून फिर्यादीस मारहाण केली. हे भांडण बघून फिर्यादी यांच्या मुलांनी फिर्यादी यांच्या वडिलांना ज्ञानेश्वर म्हस्के यांना बोलावून आणले. म्हस्के यांनी जावयाला समजावून सांगत ‘तुम्ही कशाला भांडणे करता’ असे म्हटले. त्यावरून भरत याने सासरे म्हस्के यांना उपरण्यातील दगडाने मारहाण केली. त्यानंतर म्हस्के यांच्या गालाचा जोरात चावा घेतला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.