मुलगा झाला नाही म्हणून पतीने केलेल्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

0
604

थेरगाव, दि. ५ (पीसीबी)- दोन मुली झाल्या पण मुलगा झाला नाही म्हणून पतीने पीडितेचा शारिरीक व मानसिक छळ केला. त्याच्या या छळाला कंटाळून पत्नीने आपले आयुष्य संपवले आहे. ही घटना शनिवारी (दि.2) थेरगाव येथे घडली आहे,

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात निशिकांत बबन तवंदकर (वय 29 रा. हातकणंगले, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून विशाल दादासाहेब शटके (वय 34 रा.थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचा आरोपीशी 17 जुलै 2014 रोजी विवाह झाला. मात्र त्यानंतर आरोपीने दारु पिऊन केलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरून पीडितेला पैसे आण असा तगादा लावला. पीडितेला पुढे दोन मुली झाल्या. यावेळी त्याने मला मुलगा पाहिजे होता. माझ्या वंशाला दिवा दिला नाही म्हणत पीडितेचा शारिरीक व मानसिक छळ सुरु केला. त्याच्या या छळाला कंटाळून पीडितने अखेर आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. यावरून वाकड पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.