मुंबई, दि. ३० (पीसीबी) : “भारतात सणाचा काळ आहे. मार्केटमध्येही उत्सवाचा माहोल आहे. मी वेगवेगळी प्रदर्शन पाहून आलोय. अनेक मित्रांशी बोलून आलोय. नवीन जग दिसतय मला. मी ग्लोबल फिनटेक फेस्टीव्हलच्या आयोजकांना शुभेच्छा देतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी मुंबईत BKC ला आले आहेत. ते ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलत आहेत. “मोठ्या संख्येने परदेशातून पाहुणे आलेत. एकवेळ लोक भारतात यायचे, तेव्हा इथली सांस्कृतिक विविधता बघून हैराण व्हायचे, आता फिनेटकच वैविध्य पाहून हैराण होतात” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “एअरपोर्टपासून ते स्ट्रीट फूड, शॉपिंग पर्यंत सर्व फिनटेक क्रांती दिसतेय. मागच्या 10 वर्षात फिनटेकमध्ये 31 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक झालीय” असं पीएम मोदी म्हणाले.
“मागच्या 10 वर्षात फिनेटक स्टार्टअपमध्ये 500 टक्के वाढ झालीय. स्वस्त मोबाइल, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन बँक खात्याने भारतात कमाल केलीय. काही लोक आधी संसदेत उभं राहून विचारायचे, स्वत:ला विद्धवान मानायचे, सरस्वती बुद्धी वाटत होती, तेव्हा ते रस्त्यात आधीच उभे होते” असा टोमणा पीएम मोदींनी मारला. “बोलायचे, विचारायचे भारताता बँक शाखा नाहीत, इंटरनेट नाहीय वीज नाहीय, रिचार्जिंग कुठे होणार? फिनेटक क्रांती कशी होणार? माझ्यासारख्या चहावाल्याला विचारायचे. आज बघा एक दशकात भारतात ब्रॉड बँड युजरची संख्या 60 मिलियन म्हणजे 6 कोटीने वाढून 94 कोटी झाली. आज कदाचितच कोणी भारतीय असेल, ज्याच्याकडे डिजिटल आयडेंटी आधारकार्ड नाहीय” असं पीएम मोदी म्हणाले.
किती कोटी लोकांकडे जनधन बँक खाती?
“53 कोटी पेक्षा जास्त लोकांकडे जनधन बँक खाती आहेत. 10 वर्षात एकप्रकारे संपूर्ण युरोपियन युनियनची जितकी लोकसंख्या आहे, तितकी लोक आज बँकिंग सिस्टिमशी जोडली गेली आहेत. कधी लोक म्हणाये कॅश इज किंग, आज जगातील अर्धाटाइम डिजिटल व्यवहार भारतात होतात. संपूर्ण जगात भारत यूपीआय फिनटेकच सर्वात मोठ उदहारण बनलाय. आज गाव असो किंवा शहर, सर्दी असो किंवा गरमी, पाऊस असो किंवा हिम वर्षात भारतात बँकिंग सेवा 24 तास 12 महिने चालू असते” असं पीएम मोदी म्हणाले.
“जनधन योजना महिला सबलीकरणाच खूप मोठं माध्यम बनली आहे. जनधन योजनेमुळे 29 कोटीपेक्षा जास्त महिलांची बँकखाती उघडली गेली. या खात्यात महिलांना बचत आणि गुंतवणूकीची नवीन संधी मिळाली. या जनधन खात्याच्या विचारावर मायक्रोफायनान्सची सर्वात मोठी मुद्रा योजना लॉन्च केली. या योजनेतून आतापर्यंत 27 ट्रिलियन पेक्षा अधिक कर्ज दिलय. या योजनेच्या 70 टक्के लाभार्थी महिला आहेत. जनधन कार्यक्रमाने महिलांसाठी आर्थिक सबलीकरणाचा पाया रचला आहे” असं पीएम मोदी म्हणाले.