मुदतीत सदनिकांचा ताबा व सुविधा न देता 125 नागरिकांची 11 कोटींची फसवणूक

0
96

बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – मुदतीत बांधकाम प्रकल्प बांधून सदनिकांचा ताबा दिला नाही तसेच त्यामधील सुखसुविधा दिल्या नाहीत, याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथे उघडकीस आले आहे.

अतुल्य रघुकुल, गौरव सोमाणी, नितीन जाजू, शाम लढ्ढा अशी गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धेश्वर शंकर सिनलकर (वय 45, रा. चऱ्होली, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक असलेल्या आरोपींची वडमुखवाडी येथे बांधकाम साईट सुरु आहे. त्यामध्ये त्यांनी एकूण 125 नागरिकांकडून सदनिकांची रक्कम स्वीकारून नागरिकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुदतीत बांधकाम प्रकल्प बांधून सदनिकांचा ताबा दिला नाही. त्यामधील सुविधा दिल्या नाहीत. फिर्यादी सिनलकर यांची 10 लाख 90 हजार 105 तसेच इतर 124 सदनिकाधारकांची 11 कोटी 22 अख तीन हजार 516 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.