मुख्य वित्त व लेखा अधिकारीपदी प्रविण देविचंद जैन

0
340

पिंपरी, दि. २५(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रविण देविचंद जैन यांनी २३ ऑगस्ट रोजी पदभार स्विकारला. याआधी जैन मुंबई येथील डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे लेखा व वित्त अधिकारी म्हणून कार्यरत होते. या पदावर कार्यरत असताना शासनाकडून त्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वित्त व लेखा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.

याआधी प्रविण जैन यांनी ग्राम विकास विभागात असताना प्रधान मंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उपसचिव तथा वित्तीय नियंत्रक, उल्हासनगर महानगरपालिका येथे मुख्य वित्त व लेखा अधिकारी, मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागात अप्पर सचिव, रायगड येथे जिल्हा कोषागार अधिकारी, रायगड जिल्हा परिषद येथे मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदांवर काम केलेले आहे.