मुख्य अभियंता पदावर संजय कुलकर्णी

0
132

पिंपरी, दि. २३ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रिक्त असलेल्या मुख्य अभियंता २ या पदावर पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य अभियंता २ या रिक्त जागेवर अधिकारी नियुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय नुसार सह शहर अभियंता (स्थापत्य) या पदावरील शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, शिस्तभंग आणि मत्ता व दायित्वाची माहिती, संगणक अर्हता इ. सेवाविषयक तपशील पडताळून सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांना शासन मान्यतेच्या अधिन राहून तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यासाठी स्थायी समिती सभेत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली होती.


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य अभियंता २ या पदावर रामदास तांबे हे कामकाज पाहत होते. ते नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाल्याने मुख्य अभियंता २ हे पद काही दिवस रिक्त होते. या रिक्त जागेवर पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्य अभियंता २ संजय कुलकर्णी यांची आस्थापना पर्यावरण अभियांत्रिकी विभागात असणार आहे.