मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासन हादरवलं ; 13 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

0
3

दि. 1 (पीसीबी) मुंबई  : महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका कायमच सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस दलाबाबत मोठा निर्णय घेत पोलीस प्रशासन हादरवलं आहे. तेरा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेशच गृह खात्याकडून काढण्यात आला आहे. यामध्ये राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी मनोज कुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यासह अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका एकीकडे सुरू असताना आता तेरा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ही करण्यात आल्या आहेत.तशा पद्धतीचा जीआर राज्याच्या गृहखात्याने काढला आहे.

कोणत्या 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाणून घेऊया….

1. मनोज कुमार शर्मां- विशेष पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था

2. आर बी डहाळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अभिलेख केंद्र

3. अशोक मोराळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग

4.राजीव जैन – विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल

5. निखील गुप्ता – अपर पोलिस महसंचालक, कायदा आणि सुव्यवस्था

6. सूरेश मेखला – अपर पोलिस महसंचालक, आर्थिक गुन्हे शाखा

7. यशस्वी यादव – अपर पोलिस महासंचालक, सायबर सेल

8.सुहास वारके – अपर पोलिस महासंचालक, कारागृह आणि सुधारसेवा

9.अश्वती दोर्जे – अपर पोलिस महासंचालक, महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग

10.छेरिंग दोर्जे – अपर पोलिस महासंचालक, विशेष अभियान

11.के एम मल्लिकार्जुन – अपर पोलिस महासंचालक, प्रशासन

12.अभिषेक त्रिमुखे – अपर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग

13.श्रेणिक लोढा – अपर पोलिस अधीक्षक, खामगाव बुलढाणा

राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. गृह खात्यावरून आग्रही असलेले एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आल आणि फडणवीस यांनी गृहखात आपल्याकडे ठेवलं. राज्यात नवीन सरकार आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.