मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील मोठा घोटाळा, 580 बोगस शिक्षक सरकारच्या तिजोरीला चुना

0
14

दि . १४ ( पीसीबी ) – नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करून त्यांच्या वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावण्यात आल्याचे समोर आले आहे.हे खुद्द शिक्षण विभागाने हे त्यांच्या एका आदेशात मान्य केले आहे. विशेष म्हणजे एबीपी माझाकडे शिक्षण विभागाच्या त्या आदेशाची एक्सक्लुझिव्ह प्रत आहे. या प्रकरणी तीन जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात बोगस मुख्यध्यापकाच्या भरतीवरून दोघांना अटक झाली होती. त्यामुळे बोगस शिक्षकांच्या या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने उडी घेतली असून संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्यात खासगी शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षकांची भरती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या बोगस शिक्षकांच्या वेतनापोटी सरकारच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या एका आदेशात हा प्रकार मान्य करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात खाजगी प्राथमिक शाळांमध्ये बोगस शिक्षकांची भरती केल्याच्या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेचे वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांना शिक्षण विभागाकडून विशेष आदेश काढत निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निलंबनासंदर्भात जे आदेश काढले गेले, त्यात “नागपूर जिल्ह्यामध्ये 2019 पासून 580 प्राथमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने नियुक्त करण्यात आले. तसेच त्यांच्या नियुक्तीला नियमबाह्य पद्धतीने मान्यता देऊन वेतन काढण्यासाठी आवश्यक असलेले शालार्थ आयडी सुद्धा नियमबाह्य पद्धतीने प्रदान करण्यात आले. त्यामुळे बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष नियमबाह्य पद्धतीने वेतन देऊन शासकीय तिजोरीला मोठं नुकसान पोहोचवल्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे नागपूर जिल्ह्यात खाजगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षक बोगस आहेत आणि त्या शिक्षकांचा वेतनसुद्धा अनेक वर्ष बोगस पद्धतीने उचलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता या प्रकरणात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने ही उडी घेतली असून संपूर्ण प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे… 2019 ते 22 दरम्यान नागपूर जिल्ह्यात झालेल्या शिक्षकांच्या बहुतांशी नियुक्त्या बेकायदेशीर पद्धतीने कुठल्याही मान्यता शिवाय करण्यात आल्या. त्यापैकी बहुतांशी शिक्षकांचा अस्तित्व फक्त कागदावर असून त्यांच्या नावाने वेतन उचललं जात असल्याचा आरोप माजी शिक्षक आमदार व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी केला आहे. या बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी राज्य सरकारने एसआयटीची नेमणूक करून सखोल चौकशी करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी ही ना गो गाणार यांनी केली आहे.